विजय कदम (लोकहित लाईव्ह न्यूज संपादक)
येथे आयोजित तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेतील अनेक खेळाडूंनी विविध मैदानी स्पर्धांमध्ये मारलेल्या या बाजीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवणारे विजेते खेळाडू व त्यांच्या स्पर्धा पुढीलप्रमाणे आहेत:
उन्नती रायफ़ळे ( ८०० मीटर धावणे ) दुर्गेश राठोड ( गोळा फेक )
रेणुका वयले ( लांब उडी )
अनित्य नंदागवळी ( ४०० मीटर धावणे)
नीलम खडसे (लांब उडी )
नेहा ढेकाळे ( ४०० मीटर धावणे )
संस्कृती पांढरे ( ६०० मीटर धावणे)
खेळातूनच उज्ज्वल भविष्य घडते हा संदेश देत, या सर्व यशस्वी खेळाडूंचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षक अजय हिंगणकर, महेश पाटील आणि सहकार्य करणाऱ्यांचे शाळा मुख्याध्यापक मोहन मडावी व पर्यवेक्षक श्री विजय बोकडे , शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. विजेत्या खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.












