विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
तालुका क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये शहीद भगतसिंग न.प. मराठी शाळा क्र. २, उमरखेडच्या खेळाडूंनी विविध मैदानी क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून अनेक खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
U-14 गटात १०० मीटर धावण्यात सोहम उपेवाड याने प्रथम, तर फरहान खान याने द्वितीय क्रमांक मिळविला. २०० मीटरमध्ये फरहान खान प्रथम व प्रद्युम्न राठोड द्वितीय, तर ४०० मीटरमध्ये दिगंबर कामारकर याने प्रथम क्रमांक पटकावला. ६०० मीटरमध्ये फरहान खान प्रथम, तसेच थाळीफेकीत सोहम उपेवाड याने प्रथम क्रमांक मिळविला. ४×१०० मीटर रिलेमध्ये सोहम उपेवाड, फरहान खान, प्रद्युम्न राठोड दिगंबर कामारकर व यश मेंढे यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
U-17 गटात ८०० मीटरमध्ये ओंकार याने तृतीय, १५०० मीटरमध्ये रोहन द्वितीय व ओंकार तृतीय, तर ३००० मीटरमध्ये यश धुळे याने तृतीय क्रमांक मिळविला. गोळाफेकीत प्रद्युम्न राठोड याने तृतीय क्रमांक पटकावला. रिले यांच्या संघाने प्रथम, ४×४०० मीटर रिलेमध्ये राजवीर, श्रीकांत, ओंकार, रोहन व अजमत यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
हॅमर थ्रोमध्ये कार्तिक लस्कर याने प्रथम, तर मानव धवसे याने द्वितीय क्रमांक मिळविला. ८० मीटर हर्डल्समध्ये दिगंबर कामारकर प्रथम व यश मेंढे द्वितीय ठरले.
मुलींच्या गटातही शाळेच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. २०० मीटरमध्ये समीक्षा प्रथम व श्रावणी द्वितीय, ४०० मीटरमध्ये आचल राठोड प्रथम व प्रगती इंगोले द्वितीय, तर ६०० मीटरमध्ये प्रगती इंगोले प्रथम व नंदिनी रुडे द्वितीय क्रमांकावर राहिल्या. गोळाफेकीत राखी वाढवे हिने प्रथम क्रमांक पटकावला. ४×१०० मीटर रिलेमध्ये प्रगती इंगोले, श्रावणी, समीक्षा, नेहा व कृतिका यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. व ८० मीटर हर्डल्समध्ये प्रथम श्रावणी घनसवाड
क्रमांक मिळविला.
या यशामागे विद्यार्थ्यांचा नियमित सराव, कठोर मेहनत, शिस्त, संघभावना आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. आशिष राठोड यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देत क्रीडा उपक्रमांना पाठबळ दिले. क्रीडा शिक्षक श्री. गोपाल मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नियमित सराव करून स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.
तसेच समीर पठाण सर, साळवे सर, राजे सर यांच्यासह संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंना वेळोवेळी प्रोत्साहन व सहकार्य केले. आदरणीय गोपालभाऊ अग्रवाल यांच्या विशेष प्रोत्साहन व पाठबळामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्राला अधिक चालना मिळाली.
या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याधिकारी श्री. कुरवाडे सर, माननीय नगराध्यक्षा सौ. जैन मॅडम आणि शिक्षण सभापती श्री. रसूल पटेल यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या खेळाडूंनी तालुकास्तरावर मिळविलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, सातत्यपूर्ण सरावाचे आणि योग्य मार्गदर्शनाचे फलित असून जिल्हास्तरीय स्पर्धेतही ते शाळेचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.











