दिनांक १४/०१/२०२६ रोजी सायंकाळी १९.१५ वा.चे दरम्यान नागचौक उमरखेड येथे दोन गटात चालु असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेले उमरखेड पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी यांच्यावर काही ज्ञात, अज्ञात आरोपींनी तलवार व दगडाने हमला करून त्यांना गंभीर जखमी केले यावरून जखमी पोलीस अधिकारी यांनी हॉस्पीटल येथे उपचार चालू असतांना दिलेल्या रिपोर्ट वरून उमरखेड पोलीस स्टेशन अपराध क्रमांक २४/२०२६ कलम १०९ व इतर बी.एन.एस. तसेच भा. हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचे तपासांत यापुर्वी गुन्हयातील काही आरोपींना अटक करण्यात आले होते परंतू गुन्हा घडल्यापासुन आरोपी नामे शेख अन्सार शेख इस्त्राईल रा.उमरखेड ता.उमरखेड जि. यवतमाळ हा पसार झाला होता. त्यास पकडणे बाबत वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी आदेश केले होते. त्याअनुशंगाने डि. बी. पथक मागील काही दिवसांपासुन सदर आरोपीवर गोपनीय माहीती व तांत्रिक विश्लेषण आधारे लक्ष ठेवून होते काल दिनांक १२/१०/२०२६ रोजी आरोपी नामे शेख अन्सार शेख इस्त्राईल वय. ३२ वर्ष, रा.उमरखेड ता.उमरखेड जि. यवतमाळ उमरखेड येथे असल्याचे खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने डि. बी. पथकाने सापळा कारवाई करून नांदेड रोडवरून त्यास ताब्यात घेवून, अटक करून मे. कोर्टापुढे हजर करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि. व्यंकट गंगलवाड हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. अमर मोहीते उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद चार्ज उमरखेड, ठाणेदार मा.शंकर पांचाळ पोलीस निरीक्षक उमरखेड यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. व्यकंट गंगलवाड, डी.बी.प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहा. फौजदार पंतगे, पो.हवा. संदीप ठाकूर, पो.हवा. चंदन जाधव, पो. हवा. अतुल तागडे, पो. कॉ. दिगांबर गिते, पो.कॉ. संघशील टेंबरे, पो. कॉ. विष्णू राठोड, पो.कॉ. अंकुश दरबस्तेवार सर्व उमरखेड पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.











