विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
दिनांक ११/०८/२०२६ रोजी सायंकाळी १८.११ वा.चे दरम्यान फिर्यादी साईनाथ शेषराव शिंदे वय.५० वर्ष, रा. मोहननगर उमरखेड हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए.टी.एम.मध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता ए.टी.एम.मधून पैसे निघत नसल्या कारणाने तेथे त्यांचे पाठीमागे उभ्या असलेल्या इसमाने त्यांना पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करून त्यांचेकडील ए.टी.एम. स्वतः कडे घेवून फिर्यादी यांना दुसरे ए.टी.एम.देवून पासवर्ड टाकण्यास सांगितला व सदर इसम फिर्यादीचे ए.टी.एम. कार्ड घेवून तेथून निघून गेला. त्यांनतर थोडया वेळाने फिर्यादीचे अकाउंट मधून तीन ब्रान्झेक्शन मधून एकूण २८,०००/-रक्कम काढून फिर्यादीचा बँक बॅलन्स झिरो केला वगैरे फिर्यादी वरून उमरखेड पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक ७५१/२०२६ कलम ३१६, ३१८ भा.न्या. संहीता प्रमाणे दाखल होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब यांनी सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून तात्काळ अटक करून मुददेमाल हस्तगत करणे बाबत ठाणेदार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांना सुचंना दिल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी डी. बी. पथक व आपल्या अधिनस्थ कर्मचारी यांनी सदर गुन्हयातील आरोपी शोध कामी आदेशीत केले होते त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डि.बी. पथकाने सदर गुन्हयाचे घटनास्थळाचे सि.सी.टी.व्ही. फुटेज, गोपनीय माहीती व तांत्रिक विश्लेषण चे आधारे सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी सय्यद कमालउद्दीन खान वय. ३६ वर्ष, मुळ रा. सगरासुंदरपुर कालगंज, जिल्हा. प्रतापगड, राज्य. उत्तरप्रदेश, सध्या रा. यादव मिश्रालाल चाळ यादवनगर खैरानी रोड साकीनाका अंधेरी (पश्चिम) यांस निष्पन्न करून त्याचा पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व टीमने मुंबई येथे जावून त्याचे राहते घरी शोध घेतला असता त्याचे घरातून गुन्हयातील ए.टी.एम.एक्सचेंज करून लबाडीने मिळवलेले फिर्यादीची एकूण रोख रक्कम २८,०००/- रू. जप्त करून सदरचा गुन्हा अतिशय कौशल्यपुर्ण रितीने उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई मा. कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा.गुरव कायंदेपाटील सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, ठाणेदार मा. शंकर पांचाळ पोलीस निरीक्षक उमरखेड यांचे मार्गदर्शनाखाली डी. बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहा. फौजदार पंतगे, पो.हवा. संदीप ठाकूर, पो.हवा. चंदन जाधव, पो. हवा. अतुल तागडे, पो.कॉ. दिगांबर गिते, पो.कॉ. संघशील टेंबरे, पो. कॉ. विष्णू राठोड, चापोकॉ रूद्रा सर्व उमरखेड पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.











