यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 05/10/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात अउघड गुन्हे, पाहीजे व फरार आरोपी शोध, कामी रवाना झाले. पोलीस स्टेशन महागांव हददीत पेट्रोलींग करीत असतांना खडका फाटा येथे हजर असतांना गोपनिय बातमीदारा कडून माहीती मिळाली कि, पोखरी ते खडका रोडने एक पांढ-या रंगाच्या बोलेरो पिक अप क्रमांक MH 27 X 1860 व विना क्रमांक अॅटो रिक्षा मध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेले गोवंश मास विक्री करीत असल्याबाबत माहीती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे दोन पंचासह मिळालेल्या माहीती प्रमाणे मौजे खडका फाटा येथे सापळा लावला असता पोखरी बाजूकडून एक पांढ-या रंगाच्या बोलेरो पिक अप क्रमांक MH 27 X 1860 व विना क्रमांक अॅटो हिवरा बाजूकडे येत असतांना दिसून आल्याने सदरचे वाहन रोडच्या बाजूला थांबवून पंचासह वाहनाची झडती घेतली असता बोलेरो वाहनामध्ये 06 प्लॅस्टीक पोत्यामध्ये गोमांस तसेच अॅटो रिक्षा मध्ये 03 प्लॅस्टीक पोत्यामध्ये गोमांस असा एकूण वजन 480 किलो 500 ग्रॅम मिळून आल्याने सदरचे गोमांस व बोलेरो पिक अप व अॅटो रिक्षा असा एकूण 6,94,150/- रुचा मुददेमाल जप्त करुन इसम नामे-1) शेख अन्सार शेख दाउत वय 38 वर्ष, रा.वार्ड क्रमांक 01 माहूर ता. माहूर जि. नांदेड 2) मुजाहीद खान अफजल खान पठान वय 32 वर्ष, रा. वार्ड क्रमांक 02 माहूर ता. माहूर जि. नांदेड यांचे विरुध्द पोलीस स्टेशन महागांव येथे महाराष्ट्र प्राणीरक्षण सुधारणा अधिनियम सन 1995 कायदा कलम 5 (क), 5 (ब), 9, 9(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा, मा. सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड श्री. गौरव कायंदे पाटील सा, (भा.पो.से) तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ/मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोह/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि/रविद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव, सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.











