विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
उमरखेड, दि. १७/११/२०२५ (दु. ०३:०० वा.): उमरखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज ऐतिहासिक शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून सौ. निधी नितीन भुतडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हजारो कार्यकर्त्यांच्या विराट जनसमुदायाच्या साक्षीने दाखल झालेल्या या अर्जाने, उमरखेडच्या विकासासाठी महायुती किती कटिबद्ध आहे, हे स्पष्ट केले आणि काँग्रेसच्या ढिसाळ कारभाराला आव्हान दिले आहे.
निधी भुतडा विकासाची दृष्टी आणि जनमाणसांतील पसंती
सौ. निधी नितीन भुतडा ह्या केवळ एका राजकीय उमेदवार नाहीत, तर त्या उमरखेडच्या विकासाच्या ‘निधी’च्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेची आशा आहेत.
सकारात्मक नेतृत्वाची प्रतिमा सौ. निधी भुतडा यांच्याकडे विकासाची स्पष्ट आणि दूरदृष्टी आहे. त्यांच्या ‘निधीच निधी’ या संकल्पनेतून उमरखेडच्या मूलभूत समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याची तयारी स्पष्ट होते.
उमरखेड शहरात प्रचंड पसंती त्यांचा सहज, प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे त्या उमरखेडच्या जनमाणसात अत्यंत लोकप्रिय आहेत. विशेषतः, महिला मतदारांकडून त्यांना प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एका सुसंस्कृत आणि सक्षम महिलेच्या हाती शहराची सूत्रे यावीत, अशी इच्छा व्यक्त करणारा मोठा वर्ग यावेळी स्पष्टपणे दिसून आला.
काँग्रेसवर टीका मागील काही वर्षांत काँग्रेसने केवळ पोकळ आश्वासने दिली आणि शहराच्या विकासाची गती थांबवली. आता निधी भुतडा यांच्या सक्षम नेतृत्वामुळे, काँग्रेसच्या दिशाहीन नेतृत्वाचा आणि निष्क्रिय कारभाराचा पर्दाफाश होणार आहे, हे निश्चित.
दिग्गज नेत्यांची साथ, महायुतीचे अभूतपूर्व ऐक्य
अर्ज दाखल करताना संपूर्ण महायुतीचे सामर्थ्य आणि एकी दिसून आली. आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार उत्तमराव इंगळे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार नामदेवराव ससाणे, माजी आमदार विजयराव खडसे, माजी जिप अध्यक्ष रमेशराव चव्हाण, सत्यशोधक शेतकरी संघाचे नितीनभाऊ माहेश्वरी, जिल्हा महामंत्री महेशभाऊ काळेश्वरकर, भाजपा शहराध्यक्ष अतुलजी खंदारे आणि राष्ट्रवादी शहराध्यक्ष जाकीर राज यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला.
उमरखेड शहर आता प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे. काँग्रेसने केवळ घोषणा दिल्या, पण निधी भुतडा यांच्या माध्यमातून विकासाचा ‘निधी’ थेट शहरात येईल आणि उमरखेडचे रूप पलटेल. महायुतीच्या एका ज्येष्ठ नेत्याने हा आत्मविश्वास व्यक्त केला.
या अभूतपूर्व शक्ती प्रदर्शनानंतर, सौ. निधी नितीन भुतडा यांचा विजय आता केवळ औपचारिकता राहिली असून, उमरखेडची जनता सकारात्मक बदल आणि सक्षम नेतृत्वाला मत देण्यास उत्सुक आहे हे स्पष्ट झाले आहे.






