हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- गंगाधर गायकवाड दिघी कर
हिमायतनगर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसून ग्रामपंचायत कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याचा आरोप करत त्यांच्यावर चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे. की, अनेक ग्रामसेवक आपल्या सोयीनुसार ग्रामपंचायत कार्यालयात येत असल्याने नागरिकांना जातीचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाच दाखला,जन्म-मृत्यू नोंद, विविध प्रमाणपत्रे तसेच इतर शासकीय कामांसाठी वारंवार ग्रामपंचायतीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. अनेकदा संबंधित ग्रामसेवक मोबाईलवरही उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची आर्थिक, मानसिक व वेळेची मोठी हानी होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यामुळे ग्रामपंचायतीच्या प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास कमी होत असून, तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांच्या मुख्यालयी वास्तव्यासंदर्भात व कार्यालयीन उपस्थितीबाबत सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या ग्रामसेवकांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच सर्व ग्रामसेवकांनी कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात नियमित उपस्थित राहून नागरिकांची कामे तत्काळ मार्गी लावावीत, असे निवेदन कर्ते गंगाधर गायकवाड दिघीकर, नागोराव शिंदे पळसपुरकर, देवानंद गुंडेकर सरसमकर यांनी आपल्या निवेदनाद्वारे दोषीवर तात्काळ कारवाई करण्यात यावेळी अन्यथा काही दिवसांनी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद प्रशासनाने घ्यावी आशी मागणी केली आहे.












