विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
दिनांक 07/07/2025 रोजी पोलीस स्टेशन पुसद शहर हददीत बस स्थानक पुसद परिसरात फिर्यादी अरविंद दारासिंग चव्हाण रा. आमटी पो.मोप ता. पुसद जि. यवतमाळ यांस अनोळखी इसमांने धक्कादेवून त्याचे हातातील मोबाईल व रोख रक्कम 37,000/- जबरीने खेचून नेले म्हणून तसेच पोलीस स्टेशन वसंतनगर हददीत फिर्यादी करण श्रावण राठोड यांस अनोळखी दोन इसमांने कमी पैसात पुणे जाणा-या ट्रॅव्हल्स मध्ये बसवून देतो असे सांगून त्यास मोटार सायकलवर बसवून पंचायत समिती संकूलच्या पाठीमागे नेवून त्याचे खिशातील रोख रक्कम 5000/- रु व दोन चांदीच्या धातुच्या अंगठया जबरीने काढून जबरी चोरी केल्याने पोलीस स्टेशन पुसद शहर येथे अप क्रमांक 587/2026 कलम 304, 3(5) भान्यास तसेच वसंतनगर पो स्टे अप क्रमांक 318/2026 कलम 309(6), 3(5) भान्यास प्रमाणे दिनांक 07/07/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणन्याकामी मा. पोलीस अधीक्षक साहेब तसेच मा. पोलीस निरीक्षक सा स्थागुशा यवतमाळ यांनी सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे स्थागुशा यवतमाळ कॅम्प पुसद कडील पथकांने सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी बाबत गोपनिय माहीती काढली असता सदरचा गुन्हा 1) अयाज अहेमद एजाज अहेमद व त्याचा साथीदार विधीसंघर्षीत बालक यांनी केला असल्याचे खात्रीलायक गोपनिय माहीती प्राप्त झाली. त्याप्रमाणे दिनांक 08/07/2027 रोजी स्थागुशा यवतमाळ कॅम्प पुसद कडील आरोपी शोध कामी उपविभाग पुसद रवाना होवून आरोपी शोध घेत असतांना दिनांक 09/07/2026 रोजी पथकांस खात्रीशिर गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, सदर गुन्हयातील संशयीत आरोपी अयाज अहेमद एजाज अहेमद व त्याचा साथीदार विधीसंघर्षीत बालक हे मोटार सायकलसह बरखा टॉकीज येथे थांबले असल्याबाबत माहीती मिळाल्याने नमूद पथक तात्काळ आरोपी शोध कामी रवाना होवून पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफिने आरोपी अयाज अहेमद एजाज अहेमद रा. मधुकर नगर पुसद व त्याचा साथीदार विधीसंघर्षीत बालक यास ताब्यात घेवून गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांने सर्व प्रथम उडवाउडवीचे उत्तरे देवू लागल्याने त्यास अधिक विश्वासात घेवून आरोपी अयाज अहेमद एजाज अहेमद यास विचारपूस केली असता बस स्थानक पुसद परिसरातील तसेच पंचायत समिती संकूलच्या पाठीमागील जबरी चोरी केल्याचे कबूल केल्याने दोघाची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता पोलीस स्टेशन पुसद शहर अप क्रमांक 587/2026 कलम 304, 3(5) भान्यास मधील मोबाईल व रोख रक्कम 10,200/-तसेच वसंतनगर पो स्टे अप क्रमांक अप क्रमांक 318/2026 कलम 309(6), 3(5) भान्यास मधील रोख रक्कम 5000/- रु तसेच गुन्हयातील मोटार सायकल, आरोपी मोबाईल असा एकूण 1,00,600/- मुददेमाल तसेच त्याचे ताब्यात असलेल्या प्लॉस्टीक थैली मधील 8 किलो 500 ग्रॅम वजनाचे कॉपर वायर किंमत 12,500/- असा जप्त करुन सदर कॉपर वायर बाबत विचारपूस केली असता पुसद ग्रामीण, खंडाळा, वसंतनगर, महागांव परिसरातील शेतावरील मोटार पंप व केबलची चोरी केल्याचे कबूल केले अशा प्रकारे जबरी चोरीचे 02 तसेच शेती विषयक इतर चोरीचे 06 असे एकूण 08 गुन्हे उघड करुन आरोपी अयाज अहेमद एजाज अहेमद वय 32 वर्ष, रा. तुकाराम बापू वार्ड पुसद सध्या रा. मधुकर नगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ व त्याचा साथीदार विधीसंघर्षीत बालक यांस व जप्त मुददेमाल पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन पुसद शहर यांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद, श्री. अमर मोहीते सा, तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मा. पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहीरकर, पोलीस स्टेशन पुसद शहर, मा. पोलीस निरीक्षक श्री. दिनेश झांबरे, पोलीस स्टेशन वसंतनगर यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि/रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली असून पुढील तपास सपोनि/गजानन करेवाड पोलीस स्टेशन पुसद शहर हे करीत आहे.














