विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक..
उमरखेड येथील गोपिकाबाई सिताराम गावंडे कनिष्ठ महाविद्यालय येथे फेब्रु -मार्च २६ मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावतीच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर असून गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयाने 98% निकाल देऊन जिल्ह्यात अव्वल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे .
कला शाखेतुन
कुमारी योगेश्वरी प्रदीप केळापुरे या विद्यार्थिनीने 91.17 %मार्क घेऊन कला शाखेत प्रथम स्थान पटकाविले आहे. तर वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के असून कुमारी प्राजक्ता अनंता काळबांडे या विद्यार्थिनीला ८६.३३% गुण प्राप्त झालेले आहेत तसेच
विज्ञान शाखेचा निकाल १००% असुन
श्रेयश दत्तात्रय सुने या विद्यार्थ्याने 88 % गुण घेऊन
प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे
एच.एस . सी . व्होकेशनल शाखेत
कु. जयश्री कुंडलिक मेंडके या विद्यार्थिनीने 76.67 % घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे .
सदर महाविद्यालय विदर्भाच्या शेवटच्या टोकाला असून येथे शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण व दुर्गम भागातील असून तरीही सदर महाविद्यालयाचे व्यवस्थापन प्राचार्य व सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारीवृंद, विद्यार्थ्यांची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील असतात. या सर्व गुणवंत ,यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.राम देवसरकर व संस्थेचे सचिव माननीय डॉ . या . मा . राऊत साहेब तसेच सर्व संचालक मंडळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधवराव कदम व उपप्राचार्य प्रा. लाभशेटवार ,पर्यवेक्षक प्रा. जाधव व सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकवृंदानी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. यवतमाळ जिल्ह्यात गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाचा बारावीचा निकाल सर्वोत्कृष्ट असून ही बाब जिल्ह्यासाठी व विभागासाठी कौतुकास्पद ठरली आहे .













