विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक.
श्री.शिवाजी शिक्षण संस्था पुसद द्वारा संचालित श्री. तेजमल गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय ब्राह्मणगांव तालुका उमरखेड येथून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा वर्ग १२ वी चा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असून या निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे.
विज्ञान शाखेचा 98.95 % निकाल लागलेला असून विज्ञान शाखेतून अर्णव महेश पानपट्टे 89.33 % -प्रथम क्रमांक ,कु. श्रावणी संदीप पाटील 88.33 % – द्वितीय क्रमांक तर कु.जानवी विलास पसलवाड 87.66% – तृतीय क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.
विज्ञान शाखेमध्ये प्राविण्य श्रेणी मध्ये 39, प्रथम श्रेणीमध्ये 111 विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे.
सर्व यशस्वी गुणवान विद्यार्थ्यांचे श्री. शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर, सचिव अश्विनी पाटील चोंढीकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोबतच श्री. तेजमल गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव पंजाबराव माने साहेब व आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय सौ. अर्चनाताई विजयराव माने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्राचार्य विष्णू नागोराव सादुडे, पर्यवेक्षक श्री. हरी राजाराम खोकले तथा आमचे समन्वयक श्री. भुवनेश्वर गावंडे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.













