विजय कदम लोकहित न्यूज संपादक
उमरखेड येथे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा अवघ्या ४८ तासांत छडा लावत पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आरोपींनी तोंडाला रूमाल बांधून हल्ला केल्यामुळे त्यांची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या जोरावर पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात यश मिळविले.
सय्यद आरीफ उर्फ धार सय्यद युसूफ वय २७, रा. सचिननगर, उमरखेड, अहेफाजोद्दीन उर्फ गौसोद्दीन मुज्जुमोददीन काझी वय २६, रा. सुकळी, दानीशोददीन अहेनुददीन काझी वय १८, रा. तातरशहा वॉर्ड, उमरखेड तर एक अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहेत .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि १६ जून रोजी सायंकाळी सुमारे ७.४० वाजण्याच्या सुमारास रमेश गुलाबसिंह चव्हाण वय ६०, रा. हनुमान वॉर्ड, उमरखेड हे दुचाकीवरून घरी जात असताना नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या सरकारी बंगल्याजवळ तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडविले. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तोंडाला रूमाल बांधला या होता. त्यांनी लोखंडी रॉडने चव्हाण यांच्या पायावर वार करून गंभीर दुखापत केली तसेच चाकूने गळ्यावर हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे आणि त्यांच्या पथकाने करून घटनास्थळाची पाहणी विविध पुरावे गोळा केले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.तपासादरम्यान आरोपी यवतमाळहून तेलंगणा राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मध्यरात्री सापळा रचून अवधूतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले.पोलिस चौकशीत आरोपींनी हा हल्ला परवेझ उर्फ लाला सलीम खान याच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली आहे. तसेच आरोपींना फरार होण्यासाठी मदत केल्याचेही निष्पन्न झाले असून त्याविरोधातही पुढील कारवाई सुरू असून अद्यापही शिवसैनिकांवर झालेल्या हल्ल्याचे कारण गुलदस्त्यातच आसून चर्चेला उधाण आले आहे.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकट गंगलवाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंढे, डीबी प्रमुख शरद लोहकरे, सहाय्यक फौजदार मधुकर पवार, चंदन जाधव, संदीप ठाकूर, अतुल तागडे, संतोष राठोड, दिगंबर गीते, संघशिल टेंबरे, संदीप जाधव, अंकुश दरबस्तेवार तसेच उमरखेड पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.














