विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक.
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 27/06/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात अउघड गुन्हे, आरोपी शोध, कामी रवाना झाले. पोलीस स्टेशन उमरखेड हददीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारा कडून माहीती मिळाली कि, मौजे ताजपूरा उमरखेड येथे मोहम्मद सादीक मोहम्मद हुसेन कुरेशी हा शासनाने प्रतिबंधीत केलेले गोवंश मास विक्री करीत असल्याबाबत माहीती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे दोन पंचासह मिळालेल्या माहीती प्रमाणे मौजे ताजपूरा उमरखेड येथील मुजीफ यांच्या घराजवळ गेले असता इसम नामे मोहम्मद सादीक मोहम्मद हुसेन कुरेशी रा. रहिमनगर उमरखेड ता उमरखेड दोन प्लॅस्टीक पोत्यामध्ये मास बाळगल्या स्थिती मध्ये मिळून आल्याने त्याचे ताब्यातून एकूण 73 किलो 170 ग्रॅम एकूण किंमत 14,634/- रुपये गोमांस जप्त करुन इसम नामे-मोहम्मद सादीक मोहम्मद हुसेन कुरेशी वय 30 वर्ष, रा. रा.रहिमनगर उमरखेड ता उमरखेडजि यवतमाळ यांचे विरुध्द पोलीस स्टेशन उमरखेड येथे महाराष्ट्र प्राणीरक्षण सुधारणा अधिनियम सन 1995 कायदा कलम 5 (क), 5 (ब), 9, 9(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.














