विजय कदम( लोकहित न्यूज संपादक )
मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सध्या सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर,यवतमाळ जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या Bharat Petroleum Corporation Limited (BPCL), Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) व Indian Oil Corporation Limited (IOCL) या तीनही कंपन्यांचा यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एल.पी.जी. गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा करण्यात येईल, असे संबंधित कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच ऑईल कंपनी मिळून जिल्हयातील पेट्रोल व डिझेल साठा कायम राहील याबाबत कटीबध्द आहे. जिल्हयात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने पंपावर अनावश्यक गर्दी टाळावी तसेच अफवा वर विश्वासू ठेवू नये.














