विजय कदम.( लोकहित लाईव्ह न्युज संपादक )
नगरपंचायतीच्या कामकाजाला अधिक गती आणि कार्यक्षमतेसाठी विशेष समित्यांची स्थापना जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा व नवनिर्वाचीत नगर अध्यक्ष सौ. रंजना आडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली असून त्यासाठी पुढीलप्रमाणे सभापतींची निवड करण्यात आली
बांधकाम समिती – विशाल पांडे,
आरोग्य समिती – सुनीता डाखोरे, नियोजन समिती – शाखा भरवाडे,पाणी पुरवठा समिती – सुरेश नरवाडे या निवडीमुळे नगरपंचायतीच्या विविध विकासकामांना चालना मिळणार असून शहरातील मूलभूत सुविधांच्या उभारणीस आणि नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देण्यास मदत होणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
महागाव नगरपंचायतीत स्थापन करण्यात आलेल्या या विशेष समित्यांमुळे प्रशासन अधिक सक्षम व परिणामकारकपणे काम करेल,अशी अपेक्षा यावेळीव्यक्त करण्यात आली.यावेळी माजी आमदार विजयराव खडशे अनेक मान्यवर उपस्थीत होते.














