विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
दिनांक 15 में 2026 रोजी उपविभाग उमरखेड व तहसील कार्यालय उमरखेड अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे स्थळ नगरपरिषद मंगल कार्यालय उमरखेड येथे होणाऱ्या समाधान शिबिराचे जनजागृती व प्रसिद्धी बाबत मौजा तिवडी लिंबगव्हाण व मारलेगाव गावामध्ये सभा घेऊन व शिबिरा संदर्भात निमंत्रण पत्रिका व माहितीपत्रक घरोघरी जाऊन देण्यात आले व दिनांक 12/05/2026 रोजी जाहीर प्रसिद्धी करण्यात आली समाधान शिबिरा मध्ये सर्व उमरखेड तालुक्यातील विभागाचे प्रतिनिधी शिबिरा करिता हजर राहणार आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत पंचायत समिती आरोग्य कृषी विभाग समाज कल्याण दुय्यम निबंधक भूमि अभिलेख महिला व बाल विकास विभाग वन विभाग पोलीस विभाग नगरपरिषद पंचायत समिती बांधकाम विभाग एम एस सी बी बँकिंग इतर विभागाच्या सेवा देखील उपलब्ध करून देण्यात येतील शिबिर स्थळी मिळणाऱ्या महसुली सेवा प्रमाणपत्रे आणि दाखले 👉 प्रलंबित फेरफार सातबारा मधील चुकांची दुरुस्ती डिजिटल स्वाक्षरी सातबारा उत्पन्नाचे दाखले वाटप रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले वाटप जमीन अभिलेख अद्यावतीकरण कृषक NA तरतुदी बाबत मार्गदर्शन व सुधारणा नवीन व्यवस्थापन सनद प्रक्रियेची माहिती तुकडे बंदीचा भूसंपादन व आकर्षक परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रक तयार करणे गाव नमुना अद्यावत करणे सरकारी योजना चा लाभ सामाजिक अर्थसहाय्य योजना चा लाभ मंजूर करणे घरासाठी पट्टेवाटप ई मोजणी अर्ज करणे ॲग्री स्टॅक आणि पीएम किसान नोंदणी या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे योजना चा लाभ घेण्याकरिता उमरखेड मंडळांतर्गत मंडळ अधिकारी उमरखेड श्री संजय वाघमारे ग्राम महसूल अधिकारी मारलेगाव गणपती क्षीरसागर महसूल सेवक वैष्णवी शिंदे ग्रामपंचायत अधिकारी श्री जयचंद्र राठोड व श्री सागर ढोले व श्री सायलू कोंडावार यांच्यातर्फे उमरखेड मंडळातील मारलेगाव तिवडी लिंबगव्हाण चिंचोली संगम बिटरगाव व उमरखेड शहर मधील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे 🙏













