लोकहित लाईव्ह न्यूज संपादक विजय कदम
पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण हददीत ग्राम मडकोना येथे दिनांक ०८/०५/२०२६ ते ०९/०५/२०२६ रोजी दरम्यान अज्ञात आरेपींनी जमीनी पासून ते टॉवरचे टोकापर्यंत आर.आर.एच. पावर कॉपरचा काळया रंगाचा अंदाजे ३०० मिटर किंमत ४७०००/रू चा केबल चोरून नेला होता. सदर गुन्हयामध्ये पोलीसांनी तांत्रीक तपास, सी.सी.टी.व्ही. फुटेज व तपास कौशल्याने सदर गुन्हयातील आरोपी नामे अर्पीत दिपक ठोसरे वय २० वर्ष बगमारे लेआउट पिंपळगांव यवतमाळ २. संघर्ष उर्फ लकी संजय बन्सोड वय २१ वर्ष बगमारे लेआउट पिंपळगांव यवतमाळ ३. नयन रमेश भोयर वय २४ वर्ष रा. सुरभी नगर पिंपळगांव यवतमाळ यांना अटक करून चोरी गेलेला माल व मोटार सायकल असा एकूण ९७,०००/रू चा माल हस्तगत केला. तसेच सदर आरोपीने पो.स्टे यवतमाळ हददीत सुध्दा चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांचे मार्गदर्शनात पो. स्टे. यवतमाळ ग्रामीण ठाणेदार सुनिल नाईक यांचे नेतृत्वात बिट जमादार कैलास लोथे, संजय राठोड, शंकर पेंदोर, चालक पो.कॉ. अविनाश वाघाडे यांनी केली.














