विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
पैनगंगा पात्रातील हर्रास न झालेल्या बोरी चातारी रेतीघाटावर रेती हंगाम 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झाल्याने पावसाळा सुरु होण्यापूर्वी विद्रुप झालेल्या नदीपात्राची पाहणी करण्याची मागणी तक्रारकत्र्त्याने केल्यानंतर रेतीघाटांची मुदत संपल्यावर अखेर जिल्हा खनिकर्म कार्यालयाचे भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक धनाजी जाधव हे पथकासह दि. 12 जून रोजी भल्या पहाटे संबंधित क्रारकर्ते व तलाठ्यासोबत बोरी चातारी रेतीघाटावर पोहचले व त्यांनी रेतीघाटांची पाहणी केली
विदर्भ – मराठवाड्याच्या सिमावर्ती
भागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रात बोरी चातारी हद्दीत स्थानिक अधिकाऱ्यांच्या सहमतीने मोठ्या प्रमाणात उत्खनन करून लाखो रुपयांची रेती तस्करी होत असल्याच्या पर्यावरण प्रेमी नागरीकांच्या तक्रारी मागील 3 ते 4 महिन्यांपासून महसुल प्रशासनाकडे सुरुच आहेत. परंतू स्थानिक महसुल प्रशासनाने तक्रारींना जुमानले नाही. दि. 30 मार्च रोजी एलसीबीकडून चातारी रेतीघाटात उत्खनन करणाऱ्याविरुद्ध कार्यवाही करण्याचा प्रयत्न झाला असतांना राजकिय हस्तक्षेपामुळे हा रेतीघाट चांगलाच गाजला होता तेव्हापासून महसुल प्रशासनाच्या अखत्यारित पोलीसांचा हस्तक्षेप झाला नाही त्यानंतर स्थानिक महसुल अधिकारी व रेती माफिया यांची गट्टी जमली व धुवांधार रेती तस्करी सुरु केली रेती उत्खननाच्या तक्रारी वाढत असल्यातरी या रेतीघाटावर रेती तस्करांचा मुक्त संचार होता.
पैनगंगा नदीपात्रात बोरी चातारी रेती घाटात आज सकाळी 7 वाजल्यापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर पाहणी केली. काही प्रमाणात उत्खनन होऊन रेतीची चोरी झाल्याचे दिसून आले.- धनाजी जाधव भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक जिल्हा खनिकर्म कार्यालय यवतमाळ
जिल्हा खनिकर्म कार्यालयाचे पथक भल्या पहाटे बोरी चातारी रेतीघाटात दाखल झाले नदीपात्रात 3 किलोमिटर पाहणी केली परंतू त्यांनी विदर्भ हद्दीतील पाणी व खडक असलेल्या जागेवर उभे राहुन फोटो काढले, जास्त प्रमाणात उत्खनन झालेल्या ठिकाणचे गुगल टॅग फोटो काढण्यास नकार दिला शेवटी शेवटी त्यांच्या एकंदरित देहबोलीतून गोंधळ उडाल्याचे स्पष्ट दिसत होते, त्यामुळे अहवाल सकारात्मक राहण्यासाठी शंकेची पाल चुकचुकली आहे. आपल्याकडे भरमसाठ पुरावे असून याबाबत शर्थीने पाठपुरावा करणार.
- विद्यानंद देवसरकर सामाजिक कार्यकर्ता, दिघी ता. हिमायतनगर
दि.10 जून रोजी रेतीघाटांची मुदत संपली आता नदीपात्रात पाणी यावे त्याबरोबर खड्डे झाकून जावे अशी प्रार्थना तस्कर व स्थानिक महावसुलकर्ते करीत होते.
दरम्यान 11 जून रोजी कॅनलचे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले परंतु बचाव झाला नाही, बोरी रेतीघाट भागात पाणी मात्र पोहचलेच नाही त्यामुळे रेती चोरीला गेल्याचे खनिकर्म पथकाच्या लक्षात
आले जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालय पथकामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक धनाजी जाधव महसुल सहाय्यक सुरेश ठोंबरे, वाहन चालक निलेश भाटबडवे यांच्यासह स्थानिक तलाठी राहुल चव्हाण, बोरीचे पोलीस पाटील प्रदीप माने यांचा समावेश होता आता जिल्हा खनिकर्म अधिकारी कोणावर कार्यवाही करतील याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागले आहे














