विजय कदम लोकहित लाईव्ह संपादक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची १२ यशस्वी वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांच्या संकल्पनेतून , भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा देशभरातील सुफी आणि संतांच्या दर्ग्यांवर चादर अर्पण करून फातिहा (पठण) आणि राष्ट्रासाठी प्रार्थना आयोजित करत आहे. हे लक्षात घेऊन, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश अध्यक्ष इंद्रिस मुलतानी आणि सचिव रमजान अन्सारी यांच्या आदेशानुसार, भाजप पुसद-यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुताडा यांच्या अध्यक्षतेखाली, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा उमराखेडने हजरत धोंगडे पीर बाबा (राहे) दर्ग्यात चादर आर्पण केली. दर्ग्यात फातिहा आणि दुवा आयोजित करण्यात आले होते. यामध्ये दर्ग्याच्या खाफीम, सय्यद नुर सय्यद नबी, वं सय्यद साबीर सय्यद नबी,आणि मौलानांनी फातिहा आणि सलाम पठण केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीच्या पूर्ततेनिमित्त भाजप अप पुसद – यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष रहेमत जागीरदार यांनी भारत देशासाठी प्रार्थना केली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजप अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. इरफान कुंदन, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा पुसद- यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मोहम्मद अतीक मौलाना होते. या कार्यक्रमात उमराखेड भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, जसे की अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष इस्राएल बाबा, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा ज्येष्ठ नेते सय्यद सादिक ठेकेदार, ज्येष्ठ नेते ऍड जावेद खान, ज्येष्ठ नेते ऍड अताउल्लाह पटेल, सय्यद तेहेजार, भाजपचे युवा कार्यकर्ते सय्यद रझीक, युवा कार्यकर्ते शेख हमीद उपस्थित होते.














