राजेश कदम जनजागृती लाईव्ह न्यूज
राज्य शासनाने आयपीएस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून यामध्ये यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची नागपूर येथे पोलीस उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे .त्यांच्या जागी नित्यानंद झा हे नागपूर पोलीस परिमंडळ २ येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते.त्यांच्या डॅशिंग ,दबंग प्रशासकीय अनुभवामुळे यवतमाळ जिल्ह्यातील कायदा व सुव्यावस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे .
दरम्यान कुमार चिंता यांनी आपल्या कार्यकाळातजिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पोलीस प्रशासन अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न केला . कुमार चिंता यांची बदली व त्यांच्या कामगिरीचे आणि नवीन पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांचे सर्वंत्र अभिनंदन होत आहे .
….
नित्यानंद झा साहेब सर्वांत अगोदर निष्क्रीय व अवैध व्यवसाय ,गुन्हेगारीकडे डोळेझाक करणार्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करा .अवैध व्यवसाय वरली मटका ,जुगार अड्डे, अवैध चक्री ,तीन पत्ते जुगार खुलेआम गुटखा विक्री ,चौकाचौकात गांजा विक्री ,रेती माफीयावर व ईतर बनावट मद्यपेय विक्री आणि गुन्हेगारी यावर कडक कारवाई करा . हीच जनतेची अपेक्षा आहे .














