विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 23/06/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पोलीस स्टेशन बिटरगांव हददीत मौजे ढाणकी ते सावळेश्वर रोड आदर्श नगर ले आउट जवळ पिरंजी येथील इसम नामे अनुज निळकंट लोखंडे हा सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करुन दखलपात्र गुन्हा करण्याचे इरादयाने त्याचे स्वतःचे ताब्यात प्लास्टीक थैल्यामध्ये धारधार स्टिलची मॅन असलेली तलवार व मॅन असलेला खंजीर बाळगून आहे अशी मुखबीरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने नमूद खालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासमक्ष मौजे ढाणकी ते सावळेश्वर रोड आदर्श नगर ले आउट येथे रवाना होवून नमूद इसमांस ताब्यात घेवून त्याच्या हातातील प्लास्टीक थैल्याची झडती घेतली असता त्यामध्ये एक धारदार स्टिलची मॅन असलेली तलवार व एक काळया सिल्व्हर रंगाचा प्लास्टीक मॅन स्टिलचा खंजीर असा एकूण 4,000/- रुचा मुददेमाल मिळून आल्याने ते जप्त करुन ताब्यात घेवून इसम नामे अनुज निळकंट लोखंडे वय 19 वर्ष, रा. पिरंजी ता.उमरखेड जि. यवतमाळ यांच्यावर पोलीस स्टेशन बिटगांव येथे कलम 4, 25 आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन बिटरगांव यांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ/मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.













