विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
दिनांक 23/06/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे पुसद येथे हजर असतांना पोलीस स्टेशन वसंतनगर हददीत सायंकाळी 16/30 वाजण्याचे सुमारांस सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद येथे दोन गटात हाणामारी झाली असून एका गटाकडून गावठी पिस्टलने फायरिंग झाल्याचे समजल्याने नमूद पथक तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी रवाना होवून पाहणी केली. सदर घटनेच्या अनुषंगाने दिनांक 24/06/2026 रोजी फिर्यादी वजाहद अली खान ऊर्फ अंजूम खान लियाकत अली खान यांनी दिलेल्या तक्रारी वरुन आरोपी 1) अब्दूल वाजिद अब्दुल रऊफ 2) अब्दूल राजीक अब्दुल रऊफ 3) शेख फहिम शेख करीम यांच्या विरुद वसंतनगर पोलीस स्टेशन अप क्रमांक 289/2026 कलम 109(1), 118(2), 118(1), 3(5), भान्यास 3,27 शस्त्र अधिनियम 1959 महा पो अधि कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयातील आरोपी यांची माहीती काढून तात्काळ अटक करण्याबाबत मा. वरिष्ठ अधिकारी यांनी सुचना देवून आरोपी शोध कामी वेगवेगळे तयार करुन रवाना केले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे आरोपीची बाबत गोपनिय माहीती काढत असतांना दिनांक 24/06/2026 रोजी सकाळी 5/00 वाजण्याचे सुमारास 1) अब्दूल वाजिद अब्दुल रऊफ 2) अब्दूल राजीक अब्दुल रऊफ हे सहारा पार्क गार्डन वसंतनगर येथे असल्याबाबत माहीती मिळाल्याने अतिशय शिताफिने पोलीस कौशल्याचा वापर करुन सदर गुन्हयातील आरोपी 1) अब्दुल वाजिद अब्दुल रऊफ वय 40 वर्ष, 2) अब्दूल राजीक अब्दुल रऊफ वय 33 वर्ष दोन्ही रा. रहेमनगर वसंतनगर पुसद ता. पुसद जि यवतमाळ यांना ताब्यात घेवून पुढील तपास कामी पोलीस स्टेशन वसंतनगर यांच्या ताब्यात दिले.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मा. पोलीस निरीक्षक श्री. दिनेश झांबरे पोलीस स्टेशन वसंतनगर यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे, सपोनि मनिष गावंडे, पोउपनि/शिवशंकर कायंदे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ मुन्ना आडे, सफी/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोह/बबलू चव्हाण, पोह/मिथून जाधव, पोना/अमित झेंडेकर, पोना/महेश वाकोडे, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोना/विवेक पेटे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली असून सदर गुन्हयाचा तपास सपोनि सुगत पुंडगे पो स्टे वसंतनगर हे करीत आहेत.














