विजय कदम लोकहित लाईव्ह न्यूज संपादक
उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील गजानन नारायण पेंदेवाड हे भिल नायकाडा आदिवासी व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहतात .त्यांच्या घराजवळील व्यक्तींनी त्यांना घरात घुसून जातीवाचक अश्लील शिवीगाळ करत काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली .विशेष करून ही मारहाण मानेवर करण्यात आल्यामुळे त्यांना उलट्या सुरू झाल्या ! त्यांना उपचारासाठी उमरखेड व तेथून नंतर नांदेड येथे घेऊन गेले असता वापस येताना त्यांचा रस्त्यात मृत्यू झाला .तत्पूर्वी त्यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती परंतु उमरखेड पोलिसांनी ह्या प्रकरणात विशेष लक्ष न देता ॲट्रॉसिटीचा गुन्हा असताना सुद्धा साधा अ -दखलपात्र गुन्हा नोंद करून प्रकरण रफादफा केल्याची चर्चा होती .त्यामुळे समाजामध्ये नाराजी व चिडीचे वातावरण होते .आपल्याला उमरखेड पोलिसांनी सन्मानपूर्वक तक्रारीची दखल घेतली नाही अशी ओरड सुरू होती .मयत गजानन नारायण पेंदेवाड यांची पत्नी व भाऊ यांनी उमरखेडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर 24 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजता आमरण उपोषण करणार असल्याची तक्रार देण्यात आलेली आहे. गजानन नारायण पेदेवाड यांच्या मानेवर मारून त्यांना मुक्का मार देण्यात आला होता .त्यामुळे त्यांचा उपचार करून गावाकडे येत असताना मृत्यू झाला. दिलेल्या तक्रारीनुसार उमरखेड पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला नव्हता . त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाल्यामुळे त्यांची पत्नी व भाऊ हे दिनांक 24 जून 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उमरखेड येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याचे खात्रीदायक वृत्त अग्निबाण लाईव्ह न्युज चॅनलने प्रसारित करताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण समजून घेतले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने शेवटी उमरखेड पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता2023 च्या कलम 105,296,189(4),190,
191(3),351(2),251(3),
3(1)(r), 3(1)(5), ,3(2) (va ) ॲट्रॉसिटीचा गुन्हा सात व्यक्तीवर नोंद करण्यात आला त्यात आरोपी म्हणून विडूळ येथील *बाळू बाबुराव काचेवाड,माधव बाबुराव काचेवाड,गजानन बाबुराव काचेवाड,प्रवीण माधव काचेवाड,शारदा बाबुराव काचेवाड ,अनुसया माधव काचेवाड ,सुमित्रा गजानन काचेवाड असून या सात आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस अधीक्षक कुमार चिंता व इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शकाखाडी पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी घेतलेली बघायची भूमिका अग्निबाण लाईव्ह न्युज चॅनलने उजेडात आणताच व फिर्यादी रत्नमाला गजानन पेंदेवाड यांनी दिलेल्या आमरण उपोषणाचा इशारा यामुळे पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून शेवटी वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हा नोंद केला. असून दादागिरी करणाऱ्यांचे धाबे दनानलेले आहेत.














