विजय कदम लोकहित लाईव्ह न्यूज संपादक
उमरखेड येथील राजर्षी शाहू महाराज स्मारक समिती,
व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने
राजर्षी शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंती 2026 महोत्सवाचे आयोजन शुक्रवार दिनांक 26 रोजी ‘ उमरखेड येथील जिजाऊ सांस्कृतिक भवन’ येथे करण्यात आले आहे. बहुजन समाजाचे उद्धारक,शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे राजे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती दशरथ मडावी यांची राहणार आहेत . ते ‘सद्यस्थितीत विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या समस्या आणि उपाय’ या विषयावर मार्गदर्शन करतील.कार्यक्रमासाठी राजर्षी शाहू महाराज स्मारक समिती (उमरखेड), बिरसा क्रांती दल, मराठा सेवा संघ, शेतकरी कष्टकरी संघ, बळीराजा महोत्सव समिती आणि श्रमिक शेतकरी संघटना पुढाकार घेत आहेत. तरी उमरखेड तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक यांनी केले आहे.













