विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
दिनांक 16/06/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे पुसद येथे हजर असतांना पोलीस स्टेशन उमरखेड हददीत रात्री 19/40 वाजण्याचे सुमारांस सीओ साहेब उमरखेड सरकारी बंगल्या जवळ उमरखेड येथे एका इसमांची यांची मोटार सायकल अडवून त्यास चाकू व रॉडने मारहाण झाल्याचे समजल्याने नमूद पथक तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी रवाना होवून पाहणी केली. सदर घटनेच्या अनुषंगाने दिनांक 17/06/2026 रोजी फिर्यादी रमेश गुलाबसिंग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारी वरुन अज्ञात इमसांविरुध्द उमरखेड पोलीस स्टेशन अप क्रमांक 537/2026 कलम 109(1), 126(2), 296, 3(5), भान्यास अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयातील आरोपी यांची माहीती काढून तात्काळ अटक करण्याबाबत मा. वरिष्ठ अधिकारी यांनी सुचना देवून आरोपी शोध कामी वेगवेगळे तयार करुन रवाना केले.
त्याप्रमाणे सदर गुन्हयाच्या तपासांत 05 आरोपी निष्पन्न झाल्याने त्याप्रमाणे उमरखेड पोलीस स्टेशन येथे 02 आरोपी अटक करण्यात आलेले असून निष्पन्न आरोपी नामे-परवेज ऊर्फ लाला खान सलीम खान हा मुख्य आरोपी असून तो गुन्हा घडल्यापासून फरार असल्याने सदर गुन्हयातील फरार आरोपी बाबत माहीती काढून त्यास अटक करण्याबाबत मा. वरिष्ठांनी सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे आरोपीची बाबत गोपनिय माहीती काढत असतांना दिनांक 01/07/2026 रोजी सकाळी 15/00 वाजण्याचे सुमारास सदर गुन्हयातील नजरेआड असलेला फरार आरोपी 1) परवेज ऊर्फ लाला खान सलीम खान हा शेंबाळपिंपरी परिसरात असून तो पळून जाण्याचे तयारीत आहे अशी गोपनिय माहीती मिळाल्याने शेंबाळपिंपरी येथे रवाना होवून आरोपीचा शोध घेत असतांना नमूद इसम शेंबाळपिंपरी ते कळमनुरी रोडवर दिसून आल्याने त्यास अतिशय शिताफिने पोलीस कौशल्याचा वापर करुन नमूद आरोपी 1) परवेज ऊर्फ लाला खान सलीम खान वय 34 वर्ष, रा. आठवडी बाजार रोहीनीपुरा उमरखेड ता उमरखेड जि यवतमाळ यास ताब्यात घेतले.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.














