विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
नाशिक वारकरी संप्रदायाचे निष्ठावान वारकरी, विठोबा रायांवर नितांत श्रद्धा असलेले, अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष तसेच चातारी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील विनायकराव माने यांची शिर्डी येथे संपन्न होणाऱ्या महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विनायकराव माने यांच्या अध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची शिर्डी येथील ओम साई विकास प्रतिष्ठान व बी बी सी फिल्म प्रोडक्शन यांनी दखल घेतली असून राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र साई पद्मश्री या अतिशय मानाच्या व सन्मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.
महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार वितरण सोहळा शनिवार २ मे २०२६ रोजी परिवार लॉन्स बॅक्वेट हॉल न्यू रिंग रोड सिटी मार्केट शेजारी इंडियन पेट्रोल पंपाजवळ विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर, चित्रपट, दिग्दर्शक, निर्माते,
अभिनेते प्रक्षिमित्र, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुदाम संसारे सर व महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा आयोजन समिती प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे सर यांनी दिली आहे.












