विजय कदम लोकहित लाईव्ह न्युज संपादक
आगामी सण आणि उत्सवांच्या
पार्श्वभूमीवर बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. बिटरगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील कोणत्याही मिरवणुकीत डीजे लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शांतता राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. उत्सवांचा आनंद घेताना ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळणे अनिवार्य आहे. डीजेच्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजामुळे वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना त्रास होतो. तसेच अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. हे टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सण-उत्सव हे उत्साहात आणि शांततेत साजरे व्हावेत ही सर्वांची जबाबदारी आहे. बिटरगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात मिरवणुकी दरम्यान डीजे लावण्यास सक्त मनाई आहे. जर कोणी या आदेशाचे उल्लंघन करून डीजे लावला तर संबंधित मंडळावर आणि डीजे मालकावर कठोर कार्यवाही केली जाईल. बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी सर्व गावे डीजे लावण्यावर पूर्णपणे बंदी आहे. ध्वनी प्रदूषण रोखणे आणि सार्वजनिक शांतता टिकवणे. पोलीस प्रशासनाने सण-उत्सव समित्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून पारंपारिक वाद्यांचा वापर करून उत्सव साजरा करा असे आवाहन ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी केले आहे.














